हे पुस्तक म्हणजे त्यांच्या तुरुंगातल्या आणि तुरूंगाबाहेरच्या पंचवीसपेक्षा जास्त लिखाणांचा संग्रह
आहे, जे आपल्याला त्यांच्या शब्दातील संकल्प आणि त्यांच्या कृतीतील शौर्य दर्शवते. भगतसिंग
यांनी १९२५ ते १९३१ या काळातील त्यांची क्रांतिकारक कळकळ व्यक्त करणाऱ्या निबंधांची
मालिका लिहिली. त्यांचा सर्वात प्रसिद्ध निबंध, मी नास्तिक का आहे? हा त्यांनी लाहोर
मध्यवर्ती तुरुंगात कैद असताना लिहिला होता. भगतसिंगांची प्रामाणिकता आणि प्रखर
देशभक्ती निबंधांमधून दिसून येते आणि त्यात प्रतिभाशाली कथा लिहिल्या आहेत ज्यामुळे
वाचकांमध्ये आशा, धैर्य आणि क्रांतीची ठिणगी निर्माण होईल .