वयाच्या आठव्या वर्षी स्वप्नात परमेश्वराचं दर्शन झाल्यामुळे त्याला गाढ शांतता आणि आनंद
यांची अनुभूती आली. परमेश्वराला भेटण्यासाठी, दिव्यत्वाची प्रचिती घेण्यासाठी त्यानं
ज्योतिर्विद्या, उत्कट ध्यान आणि तंत्र यांचा अवलंब केला; पण तरी परमेश्वरदर्शन होण्याचं
चिन्ह दिसेना. दारुण निराशेच्या भरात त्यानं आंतरिक अस्वस्थतेपासून सुटका मिळवण्यासाठी
भौतिक स्वप्नांचा पाठपुरावा सुरू केला; पण भौतिक सुखांनी आतली पोकळी भरून येण्यासारखी
नव्हती. br>अखेर त्याने संसाराचा परित्याग केला आणि तो संन्यासी बनला. आजकालच्या
आव्हानपूर्ण आणि बव्हंशी संभ्रमाच्या काळात आध्यात्मिक जीवनाची जडणघडण कशी होऊ शकते,
याची ही विस्मयकारक स्मरणगाथा आहे.